How to Check CIBIL Score in Mobile: फक्त 1 मिनिटात मोबाईल वरून Cibil Score पाहा, संपूर्ण प्रोसेस

Check CIBIL Score in Mobile

Check CIBIL Score in Mobile: नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये मोबाईल वरून Cibil Score कसा चेक करायचा या बद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. How to check cibil score in mobile बद्दल संपूर्ण माहिती आता आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.

How to Check CIBIL Score in Mobile? मोबाईल वरून Cibil Score कसा चेक करायचा, संपूर्ण माहिती

मित्रांनो आज काल कोणत्याही बँकेतून कोणत्याही प्रकारचे Loan कर्ज घ्यायचे म्हंटले की CIBIL Score हा हमखास लागतो. तो किती आहे या वरून बँका कर्ज पुरवठा करतात. आणि जर CIBIL Score खराब असेल तर बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा कर्ज Loan मिळणे शक्य होतं नाही.

साधारण पने व्यक्तीचा CIBIL Score हा त्याच्या Loan Repayment वर अवलंबून असतो. जर तुम्ही आगोदर Loan घेतले असेल आणि काही कारणांनी त्या कर्जाचे व्याज परत करण्यास उशीर झाला किंवा परतफेड करणे शक्य झाले नाही तर हा Cibil score कमी होतो.

सर्वसाधारण पने व्यक्तीला कर्ज मिळवण्यासाठी किमान CIBIL Score हा 720 असणे आवश्यक असते. 720 ते 900 ज्यांचा CIBIL Score असेल त्या व्यक्तीला कोणतीही बँक लगेच कर्ज देते. पण जर CIBIL खराब असेल तो 720 च्या खाली असेल तर मात्र Loan मिळणे थोडे अवघड जाते. म्हणून तुम्हाला तुमचा CIBIL Score Manage करणे आवश्यक आहे. आणि सोबतच तुमचा CIBIL Score किती आहे हे पण माहीत करून घेणे गरजेचे आहे. त्याचीच माहिती आज आपण येथे घेणार आहोत, मोबाईल वरून CIBIL Score कसा पाहायचा याची सविस्तर अशी माहिती आता आपण घेऊ.

मोबाईल वरून CIBIL Score कसा पाहायचा?

  1. सर्वप्रथम येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा, आणि तेथून SBI बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. तेथे तुम्हाला फ्री मध्ये CIBIL Score पाहण्याची सुविधा मिळेल.
  2. वेबसाईट वर पोहोचल्या नंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक सूचनेनुसार भरायचा आहे.
  3. सर्व माहिती अचूक टाकायची आहे; जसे की नाव, जन्म तारीख, पत्ता, पिन कोड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड क्रमांक इत्यादी.
  4. ही सर्व माहिती टाकून झाल्यावर तुम्हाला पुढील सूचना वाचून प्रोसेस पूर्ण करायची आहे. सर्व प्रक्रिया पार पाडल्या वर तुमच्या समोर तुमचा CIBIL Score दर्शवला जाईल.
  5. जर हा Cibil score 720 ते 900 च्या दरम्यान असेल तर तो चांगला मानला जातो. आणि जर तो 720 च्या खाली असेल 700 किंवा 650 असा असेल तर तो CIBIL Score खराब मानला जातो.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही तुमचा Cibil score मोबाईल वर अगदी काही मिनिटात फ्री मध्ये पाहू शकता.

CIBIL Score चांगला असण्याचे फायदे

CIBIL Score चांगला असण्याचे फायदे खूप आहेत. बँकेतून कर्ज मिळवणे, ऑनलाईन खरेदी करताना Discount मिळवणे, Down payment वर वस्तू खरेदी करणे असे बरेच फायदे आहेत. CIBIL Score चांगला असल्यामुळे तुम्हाला बँकेकडून Credit Card पण मिळते. या मुळे तुम्हाला बऱ्याच खरेदी वर सवलत मिळू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top