Lek Ladki Yojana 2024 Maharashtra: नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण लेक लाडकी योजना 2024 संबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अर्ज कुठे करायचा? कोण पात्र असणार? कागदपत्रे, फॉर्म PDF, नियम आणि Online form link अशा महत्वाच्या बाबी वर आपण माहिती घेणार आहोत.
Lek Ladki Yojana 2024 Maharashtra information in Marathi
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प 2023 दरम्यान जाहीर केली होती. स्वतः उपुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती. योजने अंतर्गत राज्यातील सर्व मुलींना अर्थ सहाय्य केले जाणार आहे. या संबंधीचा अधिकृत शासन निर्णय GR प्रसिद्ध झालेला आहे, आणि महत्वाची बाब म्हणजे योजनेसाठी अर्ज देखील सुरु झाले आहेत.
Highlights of Maharashtra Lek Ladki Scheme 2024
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
कोणी घोषणा केली | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील मुली |
उद्देश | महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करणे |
अधिकृत वेबसाईट | अद्याप उपलब्ध नाही |
महाराष्ट्र लेक लाडकी योजना चे मुख्य उद्देश (Objective)
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या परिवारातील मुलींना आर्थिक सहाय्य करणे त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे. मुलीच्या जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हे पण लेक लाडकी योजना चे मुख्य उद्देश आहे. पात्र परिवारातील मुलींना त्यांचे वय वर्ष 18 झाल्यावर 75 हजार रुपये मिळणार आहेत. एकूण रक्कम ही ₹1,01,000 रुपयांपर्यंत दिली जाणार आहे जी 5 हप्त्या मध्ये असणार आहे. योजनेच्या माध्यमातून समजतील मुलींप्रती ची नकारात्मक भावना दूर करण्यासाठी मदत होणार आहे. सोबतच भ्रूण हत्या या सारख्या अपराधांवर आळा बसणार आहे.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना पात्रता निकष (Elegibility)
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक योजनेसाठी पात्र आहेत.
- लाभार्थी मुलीचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे.
- लेक लाडकी योजनेचा लाभ हा केवळ 5 हप्त्यांसाठीच मिळेल.
- मुलगी 18 वर्षांची होई पर्यंतच ही आर्थिक मदत केली जाईल.
Lek Ladki Yojana Age Limit (वयोमर्यादा)
लेक लाडकी योजना साठी महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील मुली पात्र असणार आहेत. परंतु सर्वच मुली लेक लाडकी योजने अंतर्गत लाभार्थी असणार नाहीत. या योजने साठी Age Limit म्हणजेच वयोमर्यादा निकष लागू करण्यात आले आहेत. मुलीचा जन्म झाला किंवा मुलगी नवजात बालक असेल अथवा मुलगी 18 वर्षाच्या खाली असेल तर अशा सर्व मुली लेक लाडकी योजनेसाठी पात्र असणार आहेत. आणि त्यांना योजने अंतर्गत आर्थिक मदत देखील केली जाणार आहे. {Lek Ladki Yojana 2024 Maharashtra}
लाभार्थी कोण असणार?
लेक लाडकी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. ज्या परिवारांकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे त्या परिवारातील मुली लेक लाडकी योजनेसाठी पात्र असणार आहेत. ज्या परिवारांकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे, अशा परिवारात जर एखादी मुलगी 18 वर्षाच्या खाली असेल किंवा नुकताच मुलीचा जन्म झाला असेल; तर त्या परिवारातील मुली लेक लडकी योजनेसाठी लाभार्थी असणार आहे.
लाभ कसा मिळणार आहे?
लेक लाडकी योजनेअंतर्गत केशरी आणि पिवळे रेशन कार्डधारक परिवारातील मुलींना योजनेचा लाभ भेटणार आहे, त्यांना आर्थिक सहाय्यता ही महाराष्ट्र शासनाद्वारे केली जाणार आहे. मुलगी 18 वर्षाच्या खाली असेल तर तिला 4 हप्त्यात 26 हजार रुपये मिळणार आहेत. आणि जेव्हा मुलगी जेव्हा 18 वर्षाची होईल, तेव्हा तिला एकत्रित 75 हजार रुपये दिले जाणार आहेत. Lek Ladki Yojana 2024 Maharashtra
हप्ते कसे मिळणार?
5 टप्यात 0 ते 18 वर्षे एकूण मिळणारी रक्कम ₹1,01,000
पहिला हप्ता | मुलीचा जन्म झाल्यावर | ₹5,000 मिळणार |
दुसरा हप्ता | मुलगी चौथीत गेल्यावर | ₹6,000 मिळणार |
तिसरा हप्ता | मुलगी सहावीत गेल्यावर | ₹7,000 मिळणार |
चौथा हप्ता | मुलगी अकरावीत गेल्यानंतर | ₹8,000 मिळणार |
पाचवा हप्ता | मुलीचे वय 18 वर्षे झाल्यावर | ₹75,000 रोख मिळणार |
लेक लाडकी योजना नियम
- लेक लाडकी योजने मध्ये सहभागी होण्यासाठी मुलीच्या परिवाराकडे केशरी किंवा पिवळी शिधापत्रिका असावी.
- मुलगी नवजात असावी किंवा 18 वर्षाच्या खाली असावी.
- मुलीचे आधार कार्ड असावे.
- मुलीचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे.
- मुलगी आणि तिचे परिवार हे महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असावेत.
लेक लाडकी योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Document List)
लेक लाडकी योजना कागदपत्रे हे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारं आहेत. जेव्हा lek ladki yojana form भरला जाईल तेव्हा हे सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे, याची Hard Copy तयार ठेवणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- मुलीच्या पाल्यांचे आधार कार्ड
- मुलीचे आधार कार्ड
- मुलीचा जन्माचा दाखला (जन्म प्रमाणपत्र)
- रहिवासी प्रमाणपत्र
- मुलीचे पासपोर्ट साईज फोटो
- वडिलांचा मोबाईल नंबर
- वडिलांची ई-मेल आयडी
- मुलीचे बँक खाते पासबुक
Lek Ladki Yojana Online Apply – Form Link, फॉर्म, अर्ज प्रक्रिया
लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाईन स्वरुपात अर्ज सादर करायचा आहे, त्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया खाली लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? या सेक्शन मध्ये दिली आहे.
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?
- लेक लाडकी योजनेसाठी तुम्हाला तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रात जायचे आहे.
- अंगणवाडी केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे लेक लाडकी योजनेची विचारणा करायची आहे.
- त्यानंतर अंगणवाडी सेविके मार्फत लेक लाडकी योजना फॉर्म घ्यायचा आहे.
- फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
- फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- शेवटी तुम्हाला तुमचा लेक लाडकी योजना फॉर्म अंगणवाडी कार्यालयात अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांच्या कडे सुपूर्द करायचा आहे.
होम पेज | भेट द्या |
लेक लाडकी योजना फॉर्म PDF
लेक लाडकी योजना फॉर्म Download करण्यासाठी देखील महाराष्ट्र शासनाद्वारे अधिकृत सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. फॉर्म PDF ही Official Website वर उपलब्ध होणार आहे, तेथून तुम्ही लेक लाडकी योजना फॉर्म PDF पाहू शकता किंवा ती Download देखील करू शकता.
Lek Ladki Yojana FAQ
लेक लाडकी योजनेद्वारे किती रुपये आर्थिक मदत मिळणार आहे?
एकूण आर्थिक मदत ही ₹1,01,000 मिळणार आहे, ही रक्कम 5 हप्त्या मध्ये विभागली गेलेली आहे.
लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र राज्यातील केशरी, पिवळी शिधापत्रिका धारक कुटुंबातील 18 वर्षाखालील मुली.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा रीतीने करता येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरू शकता.
लेक लाडकी योजना केव्हा पासून सुरू होणार आहे?
लेक लाडकी योजना सुरु झाली आहे, या संदर्भात अधिकृत शासन निर्णय देखील प्रसिद्ध झाला आहे.