SBI Loan Scheme in Marathi: SBI बँकेकडून 20 लाखांपर्यंत लोन विना गॅरंटी मिळणार नियम व अटी पहा

SBI Loan Scheme in Marathi

SBI Loan Scheme in Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण SBI लोन योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यातून तुम्हाला विना गॅरंटी 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यामध्ये तुम्ही जर SBI बँकेचे ग्राहक असाल, आणि तुमच्याकडे एसबीआय बँकेचे खाते असेल तर तुम्हाला २० लाख रुपयांपर्यंतचे लोन बिना गॅरंटी मिळू शकते. यासंबंधीची सविस्तर अशी माहिती आता आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

SBI Loan Scheme in Marathi

SBI बँकेचे जर तुम्ही ग्राहक असाल तर तुम्हाला कस्टमाईज्ड लोन या अभिनव अशा नवीन योजनेचा लाभ घेता येतो. यामध्ये ग्राहकांना वीस लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज म्हणजेच Term Loan त्वरित मिळते. सोबतच इतर कर्ज प्रमाणे या प्रकारचे कर्ज घेण्यासाठी कोणते स्वरूपाचे भरमसाठ कागदपत्रे लागत नाहीत किमान कागदपत्रात देखील हे कर्ज तुम्ही मिळवू शकता.

एसबीआय बँक ही ग्राहकांना वेळोवेळी अनेक सुविधा देत असते, ग्राहकांचे बँकिंग विषयी सर्व कामे सुरळीत व्हावेत त्यांना कोणते स्वरूपाची अडचण येऊ नये यासाठी एसबीआय बँक सतत कार्यरत असते. आता एसबीआय बँकेने ग्राहकांना अजून एक आनंदाची बातमी देत एक नवीन वैयक्तिक कर्ज योजना सुरू केली आहे यामध्ये किमान कागदपत्रात ग्राहकाला वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

जर तुम्ही या सरकारी बँकेत तुमचे Salary Account उघडले असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेमध्ये पगार खाते उघडणाऱ्या ग्राहकांसाठी एसबीआय ही काही विशेष सुविधा देत असते. ते विशेष सुविधांपैकीच ही एक वैयक्तिक कर्जाची सुविधा आहे.

कर्जाचा लाभ कोणाला मिळतो (SBI Loan Scheme in Marathi)

  • कस्टमाईज्ड वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकाचे SBI बँकेच्या कोणत्याही शाखेत पगार खाते म्हणजेच Salary Account असावे लागते.
  • ग्राहकाचे मासिक वेतन हे किमान 15,000 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असावे लागते.
  • कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही केंद्र, राज्य किंवा निम-सरकारी, केंद्र किंवा राज्य PSU, कॉर्पोरेट किंवा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांची कर्मचारी असावी म्हणजेच व्यक्तीला सरकारी नोकरी असावी.
  • ज्या व्यक्तीला या कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याचे वय हे किमान 21 ते 58 वर्ष दरम्यान असावे.

SBI बँक ज्या व्यक्तीचे पगार खाते बँकेत आहे अशा सर्व खातेदारांना वेळोवेळी विशेष सुविधा देत असते त्यामध्ये त्यांना गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, आणि SBI वैयक्तिक कर्ज अशा वेगवेगळ्या कर्जांवर सूट देण्यात येते याशिवाय याच प्रकारच्या अनेक अशा सुविधा देखील ग्राहकांना दिल्या जातात.

20 लाखांपर्यंत कर्ज मिळेल

पगार खाते असणारे ग्राहकाला जर बँकेद्वारे कर्ज मिळवायचे असेल तर तो कस्टमाईज्ड पर्सनल लोन प्रोडक्टचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये व्यक्तीला वीस लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज टर्म लोन त्वरित उपलब्ध करून दिले जाते. सोबतच या कर्जासाठी अगदी किमान कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, सोबतच कर्ज मिळवण्यासाठी कोणते स्वरूपाची सुरक्षितता किंवा हमी देण्याची आवश्यकता नाही.

व्याजदर काय किती आहे?

जर ग्राहकाला या प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर बँके द्वारे या कर्जावर 9.60 टक्के व्याजदर लावला जातो. सुरुवातीला हा व्याजदर 9.60% राहतो मग तो पुढे 11.10% पर्यंत जातो. सोबतच यामध्ये कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाहीत असे स्वतः अधिकृत पने बँके द्वारे सांगण्यात आले आहे.

ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध

SBI बँकेद्वारे जे ग्राहक या प्रकारचे कर्ज घेतात त्यांना बँकेकडून ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील दिली जाते. यामध्ये ग्राहकांना तब्बल 2 महिन्यांचा पगार हा आगाऊ दिला जातो. म्हणजे समजा तुमचा मासिक पगार 30,000 हजार रुपये असेल तर तुम्हाला या सुविधेद्वारे 2 महिन्याचा म्हणजेच 60,000 हजार रुपये एकदाच मिळतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top