(फॉर्म) तार कुंपणासाठी सरकार देत आहे 90% अनुदान, तार कुंपण योजना महाराष्ट्र Tar Kumpan Yojana Maharashtra 2024

Tar Kumpan Yojana Maharashtra

Tar Kumpan Yojana Maharashtra, Online Apply, तार कुंपण योजना महाराष्ट्र, lokhandi tar kumpan yojana, sheti tar kumpan yojana, tar kumpan yojana Maharashtra 2024,

Tar Kumpan Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो आज आपण तार कुंपण योजना विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत, योजनेसाठी Online अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय आहे, सोबत अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागणार अशी सगळी माहिती आपण आज जाणून घेऊया. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ही महत्वाची अशी माहिती काळजीपूर्वक वाचा.

तार कुंपण योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती (Tar Kumpan Yojana Information in Marathi)

महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेत जमीन ही डोंगराळ भागात, जंगला लगत किंवा अभ्यारण्या जवळ आहे. त्यामुळे शेतीला आणि पिकाला जंगली प्राण्यांमुळे नुकसान होते, काही वेळा रानटी जनावरांचा शेतकऱ्यांना धोका देखील होऊ शकतो.

त्यामुळे शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा पेरणी आगोदर तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेतून तुम्ही तब्बल 90% अनुदानावर तार कुंपण घेऊ शकता. ते तुम्ही तुमच्या शेती भोवती लाऊन शेतीचे आणि पिकाचे रक्षण करू शकता. (Tar Kumpan Yojana Maharashtra)

तार कुंपण योजना महाराष्ट्र ही शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे रक्षण जनावरांपासून करण्यासाठी सर्वात प्रथम डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास प्रकल्पाद्वारे सुरू करण्यात आली. यामधे वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील म्हणजेच जंगला जवळील, डोंगराळ भागातील, अभयारण्या जवळील अशा वन्य प्राण्यांच्या ठीकण्या जवळील शेतीला योजना लागू होते. या योजनेतून शेतकरी शेतीला जाळीचे कुंपण करू शकतात.

तार कुंपण योजना उद्देश (Tar Kumpan Yojana Maharashtra 2024 Objectives)

जंगलातील जंगली प्राण्यांपासून तसेच रानटी जनावरां पासून शेतीचे परिणामी पिकांचे रक्षण करण्यासाठी ही तार कुंपण योजना सुरू करण्यात आली. रानटी जनावरां पासून शेतीचे रक्षण हेच या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना अगदी माफक दरात या योजने अंतर्गत तार दिली जाते, 90% अनुदानावर ही कुंपण तार शेतकऱ्यांना कंपन्यांद्वारे पुरवली जाते.

शेती भोवती जर तुम्ही हे तराचे कुंपण लावले तर त्याचा नक्कीच तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. शेतपिकाचे संरक्षण तर होणारच आहे, आणि जनावरांचा उपद्रव देखील यामुळे कमी होनार आहे. (Tar Kumpan Yojana Maharashtra)

तार कुंपण योजनेसाठी अर्ज कसा करायचा? (Tar Kumpan Yojana Maharashtra 2024 Online Apply)

शेतकऱ्यांना या तार कुंपण योजना मध्ये सामील होण्यासाठी Online अर्ज करावा लागणार आहे. योजनेसाठीचा संपूर्ण फॉर्म हा ऑनलाईन भरायचा आहे, त्याची प्रक्रिया Step नुसार खालील प्रमाणे असेल.

तार कुंपण योजना महाराष्ट्र 2024 साठी सध्या Online अर्ज सुरू झाले नाहीत, त्यामुळे तुम्हाला जर शेतीला लवकरात लवकर कुंपण लावायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला लागलीच तुमच्या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती मध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. तेथे जाऊन तुम्ही ऑफलाईन रीतीने तार कुंपण योजने साठी अर्ज करू शकता.

तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये जाऊन तुम्हाला तार कुंपण योजना साठी अर्ज करायचा आहे. पंचायत समिती मधील अधिकारी तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती सांगतील, त्यानुसारच तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा आहे. दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून तुम्हाला फॉर्म भरून त्याला आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. {Tar Kumpan Yojana Maharashtra}

योजनेसाठी करावयाचा अर्ज नमुना तुम्हाला अधिकारी देतील, सर्व फॉर्म भरून तुम्हाला तो पुन्हा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करायचा आहे. एकदा का तुमच्या शेतीची पडताळणी झाली की, त्यानंतर तुम्हाला तार कुंपण योजना द्वारे 90% अनुदानावर तार कुंपण करता येईल, पण वरचे 10% रक्कम तुम्हाला स्वतः द्यावी लागेल. या मध्ये तुम्हाला काटेरी तार आणि लोखंडी खांब अनुदानावर भेटतात.

तार कुंपण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Tar Kumpan Yojana Document List)

तार कुंपण योजना साठी अर्ज करताना तुम्हाला फॉर्म सोबत खाली दिलेले सर्व कागदपत्रे सादर करावे लागतात. हे कागदपत्रे फॉर्म ला जोडून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे.

  • सातबारा 7/12 (जंगला जवळील शेतजमीन)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड

तर वर सांगितलेले 3 कागदपत्रे तुम्हाला योजनेसाठी फॉर्म भरत असताना सोबत जोडून अधिकाऱ्यांकडे द्यायचे आहे. कागदपत्रांच्या आधारेच पात्र अपात्र व्यक्तीची पडताळणी होणार आहे, त्यामुळे हे तिन्ही कागदपत्रे सोबत ठेवा. {Tar Kumpan Yojana Maharashtra}

तार कुंपण योजना (Tar Kumpan Yojana Maharashtra) FAQ

Q: तार कुंपण योजनेद्वारे शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते?

Ans: शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळते, पूर्ण रकमेवर फक्त 10% रक्कम स्वतः द्यावी लागेल.

Q: तार कुंपण योजनेद्वारे शेतकऱ्यांना काय काय मिळते?

Ans: योजने द्वारे शेतकऱ्यांना काटेरी तार आणि लोखंडी खांब मिळतात.

Q: तार कुंपण योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत?

Ans: ज्या शेतकऱ्यांची जमीन डोंगराळ भागात, जंगला जवळ, अभयारण्या जवळ असते त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

निष्कर्ष Conclusion

तर मित्रांनो ही होती तार कुंपण योजना (Tar Kumpan Yojana Maharashtra) संबंधीची माहिती. मला आशा आहे तुम्हाला ही महत्वाची अशी तार कुंपण योजनेची माहिती आवडली असेल, त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

धन्यवाद !!

6 thoughts on “(फॉर्म) तार कुंपणासाठी सरकार देत आहे 90% अनुदान, तार कुंपण योजना महाराष्ट्र Tar Kumpan Yojana Maharashtra 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top